ETV Bharat / state

Nashik Crime News : रेल्वे पोलिसांकडून बिहारमधील 60 मुलांची सुटका, मदरशाच्या नावाखाली मुलांच्या तस्करीचा धंदा? - 60 children were rescued Manmad Railway Police

बिहारमधून आणण्यात आलेल्या 60 मुलांची मनमाड रेल्वे पोलिसांनी सुटका केली आहे. हे मुले 5 ते 18 वयोगटातील आहेत.आरक्षित रेल्वेच्या डब्यात चढल्यामुळे प्रवाशांनी त्यांची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर हा प्रकार उघकीस आला.

बिहारमधील 29 मुलांची सुटका,
बिहारमधील 29 मुलांची सुटका,
author img

By

Published : May 31, 2023, 12:30 PM IST

Updated : May 31, 2023, 3:09 PM IST

नाशिक : महाराष्ट्रातील भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकांवर मंगळवारी रात्री पोलिसांनी 60 अल्पवयीन मुलांची सुटका केली. त्यांना बिहारमधून महाराष्ट्रातील सांगली, पुण्यातील मदरशांमध्ये नेले जात होते. सर्व मुलांचे वय ५ ते १५ वर्षांच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना येथे आणणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

60 मुलांची रेल्वे पोलिसांनी केली सुटका : बिहारमधून आणण्यात आलेल्या 60 मुलांची रेल्वे पोलिसांनी सुटका केली आहे. बिहारमधून दानापूर एक्सप्रेसने 60 मुलांना सांगलीच्या मदरशात नेण्यात येत होते. हे मुले 5 ते 18 वयोगटातील आहेत. मननाड या रेल्वे स्थानकात रेल्वे उभी असताना हे मुले आरक्षित रेल्वे डब्यात चढल्यामुळे ही बाब समोर आली आहे. या मुलांची तस्करी केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

4 जणाविरुद्ध मनमाड रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा : मिळालेल्या माहितीनुसार, हे मुले 8 ते 18 वयोगटातील आहेत. बिहारमधून त्यांना सांगलीच्या मदरशात आणले जात होते. जनरल तिकीट घेऊन मुले आणि त्यांच्या सोबत असलेले 4 जण आरक्षित रेल्वेच्या डब्यात चढल्यामुळे प्रवाशांनी त्यांची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या प्रकरणात हस्तक्षेप केला. पोलिसांनी मुलांची चौकशी केल्यानंतर तस्करीचा प्रकार आला उघडकीस आला. दरम्यान रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन सर्व मुलांची नाशिकच्या बाल सुधारगृहात केली रवानगी केली आहे. सोबत असलेल्या 4 जणाविरुद्ध मनमाड रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा करण्यात दाखल करण्यात आला आहे.

प्रवाशाच्या तक्रारीनंतर प्रकरण उघडकीस : या मुलांना बिहारहून आलेल्या दानापूर एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यासोबत या ट्रेनमध्ये अन्य ५ जणही होते, जे त्यांना पुण्याला घेऊन येत होते. मुलांच्या आरक्षित डब्यात पोहोचल्यावर एका प्रवाशाने ट्विट करून रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वेच्या डब्यात काही मुले असल्याचे प्रवाशाने रेल्वे पोलिसांना सांगितले. जे भुकेले आणि तहानलेले दिसत आहेत. कृपया त्यांना मदत करा. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडीची तपासणी केली. 29 मुलांना जागीच ट्रेनमधून उतरवण्यात आले. पोलिसांनी त्यांच्यासह 1 मौलवीलाही अटक केली आहे. यानंतर रेल्वे पोलिसांनी मनमाड रेल्वे स्थानकावर पुन्हा गाडीची तपासणी केली असता त्यात आणखी ३१ अल्पवयीन मुले आढळून आली. पोलिसांनी त्यांनाही रेल्वेतून सुखरूप बाहेर काढले. या मुलांसोबत प्रवास करणाऱ्या अन्य चार जणांनाही अटक करण्यात आली आहे.

मुलांना जळगाव, नाशिकच्या बालगृहात : मुलांची तस्करी केल्याच्या आरोपावरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडून पालकांचे संमतीपत्र मिळालेले नाही. भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटका करण्यात आलेल्या 29 बालकांना जळगाव बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर आणखी ३१ मुलांना नाशिकच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.

Last Updated : May 31, 2023, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.