ETV Bharat / state

2020 हे 'कृषी उत्पादक वर्ष' म्हणून साजरे होणार; कृषीमंत्र्यांची घोषणा - agriculture meeting nashik

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडली.

agriculture minister dada bhuse
2020 हे 'कृषी उत्पादक वर्ष' म्हणून साजरे होणार; कृषीमंत्र्यांची घोषणा
author img

By

Published : May 20, 2020, 7:41 PM IST

नाशिक - कोरोना आणि संचार बंदीमुळे राज्यात पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी मालाची गरज भासणार असल्याने 2020 हे वर्ष 'कृषी उत्पादकता वर्ष' म्हणून साजरा करण्याचा संकल्प राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. ही माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले आहे.

2020 हे 'कृषी उत्पादक वर्ष' म्हणून साजरे होणार; कृषीमंत्र्यांची घोषणा

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडली. यावेळी कृषिमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण शेतीविषयक निर्णयांची माहिती बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना दिली तसेच त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज देण्यात येणार आहे. कोरोनामुळे बळीराजावर ओढवलेल्या आर्थिक संकटात कोणीही बियाणांची साठेबाजी करून त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये, असे करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषीमंत्री भुसे यांनी दिला.

दरम्यान, यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या विविध समस्या कृषिमंत्री आणि पालकमंत्री यांच्यासमोर मांडल्या. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी आयोजित या हंगामपूर्व खरीप बैठकीत जिल्ह्याचा खरीप आणि रब्बी पिकांच्या परिस्थितीचे सादरीकरण केले. या बैठकीला कृषीमंत्री दादा भुसे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ जिल्हा कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांच्यासह कृषी विभागाचे उपविभागीय स्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.