ETV Bharat / state

लग्न उरकून लॉनमध्ये उभारलेल्या महिलेचे ९१ ग्रॅम दागिने चोरट्यांनी पळवले; घटना सीसीटीव्हीत कैद - पार्किंग

नातलगाच्या लग्नासाठी आलेल्या पुण्याच्या महिलेचे तब्बल ९१ ग्रामचे दागिने चोरट्यांनी पाळत ठेऊन पळून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २१ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील चितेगाव फाट्यजवळील कुलस्वामिनी लॉनमध्ये घडली.

लग्न उरकून लॉनमध्ये उभारलेल्या महिलेचे ९१ ग्रॅम दागिने चोरट्यांनी पळवले
author img

By

Published : May 26, 2019, 3:07 PM IST

नाशिक - नातलगाच्या लग्नासाठी आलेल्या पुण्याच्या महिलेचे तब्बल ९१ ग्रामचे दागिने चोरट्यांनी पाळत ठेऊन पळून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २१ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील चितेगाव फाट्यजवळील कुलस्वामिनी लॉनमध्ये घडली. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सीसीटिव्ही फुटेज...

पुण्यातील बालेवाडीच्या आराधना लोंखडे या आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी, नाशिकच्या चितेगाव फाट्याजवळील कुलस्वामीनी लॉनमध्ये आल्या होत्या. त्या लग्न उरकून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास परत पुण्याकडे निघण्याची तयारी करत होत्या. यासाठी त्या आपले सामान कारमध्ये ठेवत होत्या. तेव्हा पाळत ठेऊन बसलेल्या तिघांनी त्यांच्या अंगावरिल दागिने जबरदस्तीने हिसकावून पल्सर मोटारसायकलीवरून पळ काढला.

आराधना लोखंडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी या चोरांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. तेव्हा याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या दागिन्यांची किम्मत सुमारे अडीच लाख रुपये होती.

Intro:नाशिक शहरात सोनसाखळी चोरी प्रमाण वाढत असतानाच आता सोनसाखळी चोरीचं हे लोन ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. पुण्यातिल बालेवाडीच्या आराधना लोखंडे या महिला आपल्यानातेवाईकाच्या लग्नानिमित्त २१ मे ला नाशिकच्या चितेगाव फाट्याजवळील कुलस्वामिनी लॉन्समध्ये आल्या होत्या. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास लग्नआटोपून लॉन्सच्या पार्किंगमध्ये आपल्या कारमध्ये सामान ठेवत असतानाच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या पल्सर बाईकवरून तिघे जण आले आणि मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील ९१ ग्रॅम वजनाचे सुमारे अडीच लाख रुपयांचे तीन सोन्याच्या पोत लांबवल्या आणि ते फरार झालेय..Body:लोखंडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी या चोरांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागू शकला नाही याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करताहेत.Conclusion:जवळपास 91 ग्रँम महिलेच सोन चोरी झाल्याने सर्वच महिलाची धावपळ ऊडाली होतीय..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.