नाशिक - शहर आणि परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची मोठी कारवाई करण्यात आली. वर्षभरात तब्बल १५८ गुन्हेगार तडीपार करण्यात आले असून जवळपास २३८ गुन्हेगार रडारवर आहेत. टोळ्यांमधील जवळपास ७४ सराईत गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे.
शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांना पायबंद घालून कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ब्ल्यू प्रिंट तयार करून तडीपारीची कारवाई केली. शहरात घडलेल्या गुन्ह्यांच्या निष्कर्षांअंती चौकशी करत गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या एकूण १५८ गुन्हेगारांना जिल्ह्या बाहेरचा रस्ता दाखविला आहे. शहरात दोनपेक्षा अधिक गुन्हे ज्या सराईत गुन्हेगारांवर आहेत त्यांच्यावर ही धडक कारवाई नाशिक पोलिसांनी केली आहे.
हेही वाचा- राज ठाकरेंनी झेंड्याचा रंगच नाही तर, मनही बदलावे - रामदास आठवले