ETV Bharat / state

CORONA : नाशकात 20 देशातून आलेल्या 102 जणांचे विलगीकरण

२० देशातील १०२ नागरिक परदेशातून मुंबई बरोबरच इतर शहरातून नाशिक मध्ये परतले आहेत. ह्यात दुबईहून ४२, इटली १२, चीन ३, सौदी अरेबिया ६, जर्मनी ४, युके ५ तर इतर देशातील प्रत्येकी एक नागरिक नाशिकमध्ये परतले आहेत. त्यांचे शासकीय आणि खासगी रुग्णालयात विलगीकरण करत त्यांची कोरोनाबाबत चाचणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.

नाशकात 20 देशातून आलेल्या 102 जणांचे विलगीकरण

author img

By

Published : Mar 18, 2020, 1:27 PM IST

Updated : Mar 19, 2020, 3:45 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाशकात २० देशातून आलेल्या १०२ जणांचे शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात विलगीकरण करत त्यांची कोरोनाबाबत चाचणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.

नाशकात 20 देशातून आलेल्या 102 जणांचे विलगीकरण

देशात परदेशातून येणाऱ्या नागरीकांमुळे भारतात कोरोनाचा फैलाव झाला आहे. ह्यामुळे केंद्र सरकारने कोरोना संसर्गबाधित देशातून भारतात येणाऱ्या ७ देशातील नागरिकांवर बंदी घातली आहे. ह्यात आता अमेरिका, दुबई आणि सौदी अरेबिया देशांची भर पडली असून हा आकडा १० वर पोहचला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची विमानतळावर वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

२० देशातील १०२ नागरिक परदेशातून मुंबई बरोबरच इतर शहरातून नाशिकमध्ये परतले आहेत. ह्यात दुबईहून ४२, इटली १२, चीन ३, सौदी अरेबिया ६, जर्मनी ४, युके ५ तर इतर देशातील प्रत्येकी एक नागरिक नाशिकमध्ये परतले आहेत.

हेही वाचा - नाशिकातील मंदिरे राहणार बंद; प्रशासनाचा निर्णय

कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या नागरिकांची ओळख पटवून त्यांना शहरातील जिल्हा रुग्णालय, तसेच डॉ जाकीर हुसेन रुग्णालय, अपोलो रुग्णालय, सयाद्री रुग्णालय, डॉ वसंत पवार मेडिकल कॉलेज ह्या खाजगी रुग्णालयातील विलगिकरण कक्षात तपासणीसाठी दाखल केले जात आहे. सोबतच त्यांच्या हातावर विशिष्ट शिक्का मारला जात आहे. तसेच, परदेशातून कोणी आलं असेल मात्र, त्याने माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली. तर, त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे.

हेही वाचा - पोलिसांकडून मौलानांना कोरोना विषयी जनजागृतीचे आवाहन; एकत्र जमण्यावर मात्र चुप्पी

Last Updated : Mar 19, 2020, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.