ETV Bharat / state

Gulabrao Patil : रक्ताच्या नात्यात भेट घेणं काय वाईट? : मंत्री गुलाबराव पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काका, पुतण्या असून यांच्यात रक्ताचे नाते आहे. रक्ताच्या नात्यात भेट घेणे काय वाईट आहे? जो तो आपल्या परीने या भेटीचा अर्थ काढत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून अजून पालकमंत्री पदाचे वाटप झालेले नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पालकमंत्री पदाचे वाटप करतील, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नंदुरबार येथे दिली.

Minister Gulabrao Patil
मंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Aug 13, 2023, 7:49 PM IST

गुलाबराव पाटील यांचे राजकीय परिस्थितीवर भाष्य

नंदुरबार: कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संकुल आणि यासह विविध संस्थांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करत शरद पवार, अजित पवार यांच्या भेटीवर भाष्य केले. तर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने आमच्यावर झालेल्या खोक्यांच्या आरोपांपासून आम्ही मुक्त झालो. दुसरीकडे राज्यात अलीकडे झालेला शपथविधी हा सकाळ, संध्याकाळ, दुपार तीन वेळ पूर्ण झाल्याचा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. याप्रसंगी मंत्री अनिल भाईदास पाटील, आ. शिरीष कुमार नाईक, आ. राजेश पाडवी उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर: शिंदे गटातील आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी त्यांचे काम करावे. जनता निर्णय घेईल असे प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंना दिले. जळगाव जिल्ह्यात पत्रकाराला झालेल्या मारहाणीची पोलिसांनी योग्य चौकशी करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

'या' जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती: धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये दोन महिन्यानंतरही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या भागातील धरणात अत्यल्प पाणीसाठा असून या भागात पाणीटंचाईची समस्या आहे. तर अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या संदर्भात ऑगस्ट महिन्यात राज्य शासनाच्या वतीने आढावा घेण्यात येत आहे. ज्या भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्या भागातील नागरिकांना राज्य सरकारकडून मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री पदाविषयी अनिल पाटील यांचे स्पष्टीकरण: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा असल्याची चर्चा माध्यमांच्या माध्यमातून होत आहे. मात्र राज्याचा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील, असा दावा राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदा संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात भेट झाल्याचे मला माध्यमातून समजले; मात्र या संदर्भात अजून अधिकृत कुठलीही माहिती आपल्याकडे नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Ajit Pawar Sharad Pawar Meeting : अजित पवारांनी शरद पवारांना काय दिला प्रस्ताव? आणखी भेट होण्याची शक्यता
  2. Independence Day : पंतप्रधान मोदींनी बदलला सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटो; 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
  3. FIR On Priyanka Gandhi : मध्य प्रदेश सरकारवर कमीशनखोरीचा आरोप भोवला, प्रियंका गांधींसह कमलनाथांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.