नंदुरबार - पोलीस वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रेझिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने रविवारी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन व शस्त्रासंबंधी माहिती देण्यात आली. यावेळी शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शस्त्र कशी हाताळावी, याबाबत प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.
हेही वाचा - 'भाजपने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी घेतलेले चुकीचे निर्णय रद्द करणार'
दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी १९६१ ला महाराष्ट्र पोलीस विभागास ध्वज सुपूर्द केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस विभागाच्यावतीने रेझिंग डे साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
हेही वाचा - नवनियुक्त मंत्र्यांच्या सभेत डुकराच्या पिल्लाचा गोंधळ
यावेळी पोलीस खात्यातील विविध शस्त्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. रेझिंग डे सप्ताहाचे उद्घाटन नंदुरबार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर व पोलीस कर्मचारी यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखवले.