नंदुरबार - शहादा शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या स्वच्छतागृहाच्या मागच्या बाजूला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. गजबजलेल्या शहादा बसस्थानकात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - शासकीय आश्रमशाळेत आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पाय घसरून मृत्यू
शहादा शहरातील बस स्थानक परिसरात स्वच्छतागृहाच्या मागच्या बाजूला अंदाजे ५० वर्षे वयाच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून त्याच्या तोंडातून रक्तस्रावही झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात हा प्रश्न उपस्थित झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शहादा ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.
हेही वाचा - चेतक महोत्सवामध्ये पाच दिवसात सव्वादोन कोटींचा टप्पा पार, नव्या विक्रमाची शक्यता
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून पुढील तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. सकाळी बसस्थानक स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.