नंदुरबार - नवापूर शहरातील स्वच्छतेचा पुर्णता बोजवारा उडाला असुन विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकार्यांना घेराव घातला. याबाबत योग्य कारवाई न झाल्यास परिसरातला कचरा नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात टाकण्याच्या इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा - नवापूर महाविद्यालयात लाखो रुपयांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात डेंग्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकट्या साईनगरी परिसरात डेंग्यूचे सात रूग्ण आढळले आहेत. सायंकाळी शहरातील नागरीक मोठया संख्येने साईमंदिर परिसरात फिरायला जातात. मात्र डासांमुळे बसणे सोडा फिरणेसुद्धा दुरापस्त झाले आहे. शहरातील इतर ठीकाणीही हिच परिस्थिती आहे. डासांचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता नगरपालिका प्रशासन कुचकामी उपाययोजना करत आहे. केवळ रॉकेलची फवारणी केली जाते, त्यात औषधे नसते. नगर परिषद प्रशासनाचा ठेकेदारावर वचक नाही. त्यामुळे स्वच्छतेचे बारा वाजले आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.