नंदुरबार - अक्षय तृतीयेला खान्देशात शेतगडी (सालदार)वर्षभर कामांसाठी ठरविले जातात. हे गडी ठरविताना विविध पद्धती आहेत. नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात वर्षानूवर्षे ही पद्धत जोपासली जात आहे काय आहे. ही पद्धत या वरील ईटीव्ही भारतचा एक खास रिपोर्ट...
शेतीत वर्षभर कामासाठी शेतकरी आपल्याकडे सालदार लावत असतात. अशा गड्याचे वर्षभराचा पगार म्हणजेच साल ठरविण्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्त निवडला जातो. गड्याचं साल ठरविताना त्याची ताकद आणि चिकाटी पहिली जाते. माळीवाडा परिसरात या गड्याची निवड करण्यासाठी या भागातील चौकात असेलेल्या दोन मोठ्या दगडांची पूजा केली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी आलेले तरुण या दगडांना उचलण्याचा प्रयत्न करतात जे तरुण हे गोटे उचलतात मग त्याच्या वर्षाचा पगार ठरविण्याची लगबग सुरु होते .यावर्षी सालदारांचे वर्षभराचे पॅकेज 60 हजारां पासून ते 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत ठरत आहे. त्यासोबतच त्याला कपड्याचे दोन जोड आणि दोन पोते धान्य दिले जाते. माळी वाडा परिसरात ही शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आजतागायत टिकून आहे.