ETV Bharat / state

उचीशेवडी शिवारातील फुटलेल्या धरणाकडे वर्षभरानंतरही दुर्लक्षच; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

उचीशेवडी शिवारातील धरण फुटल्याने शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत काही जनावरेही वाहून गेली. तसेच सखल भागातील शेतांमधील वहिरी व बोरवेलध्ये धरणाचा गाळ साचला आहे. शिवाय नदीत असलेले विज पंप वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसानही झाले. मात्र अद्यापही प्रशासनाने याची पाहणी केलेली नाही.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
author img

By

Published : Aug 2, 2019, 12:47 PM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्षभरापूर्वी उचीशेवडी शिवारातील धरण फुटले होते. त्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत काही जनावरेही वाहून गेली. तसेच सखल भागातील शेतांमधील विहिरी व बोरवेलध्ये धरणाचा गाळ साचला आहे. शिवाय नदीत असलेले वीज पंप वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. मात्र या नुकसानीची प्रशासनाने अद्यापही पाहणी केलेली नाही.

उचीशेवडी शिवारातील फुटलेल्या धरणाकडे लघुसिंचन विभागाचे दुर्लक्ष

धरणाची दुरुस्ती न झाल्याने धरण फुटल्या गेले आहे. दरवर्षी यामधून पाणी वाहून जावून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी झालेल्या नुकसानीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यात आणखी यावर्षीही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. लघु सिंचन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. पाटबंधारे विभागाने उचीशेवडी शिवारातील फुटलेले धरण आमच्या अंतर्गत येत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे. वर्षपूर्तीनंतरही धरणाच्या दुरुस्तीसंदर्भात कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एकीकडे पंतप्रधान शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगतात आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच शासनातील अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावरून शेतकऱ्यांसाठी सरकार आणि प्रशासन किती गांभीर्याने काम करत आहे, हे दिसून येते. नंदुरबार जिल्ह्याला डॉ. राजेंद्र भारूड एक सक्षम जिल्हाधिकारी लाभले आहे. त्यांनी तरी या आदिवासी शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन धरणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Intro:१७ ऑगस्ट २०१८ रोजी नवापूर तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उचीशेवडी शिवारातील धरण फुटून शेतकऱ्यांच्या शेताचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. या दुर्घटनेत काही जनावरेही वाहून गेली होती. तसेच धरण फुटल्याने खालच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात असलेल्या विहिरी आणि बोरवेल धरणातील गाळाने पुरले गेले होते. तर नदीत असलेल्या शेतकऱ्यांचे विज पंप वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. Body:या धरणामुळे शेतकऱ्यांचा मोठ आर्थिक नुकसान झालं होतं तरीही संबंधित विभागाने वर्ष उलटूनही या धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा या धरणाच्या दुरुस्तीची मागणी केली परंतु लघु सिंचन विभागाने अद्यापपर्यंत या धरणाची पाहणी सुद्धा केलेली नाही.

फुटलेल्या धरणाची दुरुस्ती न झाल्यामुळे यावर्षी धरणात पाणी न थांबता वाहून जात असल्याने येथील शेतकऱ्यांचे यावर्षीही शेतीच आणि पिकांचं नुकसान होत आहे. मागच्या वर्षी झालेल्या नुकसानीचे पैसेच अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यात आणखी भर होत संबंधित विभागाच्या दुर्लक्षते मुळे यावर्षीही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो आहे.

उचीशेवडी शिवारातील फुटलेल्या धरणाच्या दुरुस्तीबद्दल पाटबंधारे विभागात चौकशी केली असता त्यांनी हा बंधारा आमच्या अंतर्गत येत नाही असं सांगत जबाबदारी झटकली त्यानंतर लघुसिंचन विभागाकडे धरणाच्या दुरुस्ती बद्दल विचारले असता वर्षपूर्तीनंतरही धरणाच्या दुरुस्तीसंदर्भात कोणतीच कार्यवाही केलेली नाही.

एकीकडे पंतप्रधान शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायला निघाले आहे तर, त्यांच्याच शासनातले अधिकारी शेतकऱ्यांचं दुबार नुकसान करत आहे. यावरून हेच दिसून येते कि शेतकऱ्यांसाठी सरकार आणि प्रशासन किती गांभीर्याने काम करत आहे.Conclusion:आदिवासी समाजाचे नवीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड एक सक्षम अधिकारी या जिल्ह्याला लाभले आहे, त्यांनी तरी या आदिवासी शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन या धरणाची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.