ETV Bharat / state

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात दोन्ही राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आढावा - नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ७ पेशंट आहेत. तापी जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त भेट देऊन बॉर्डर सिलिंग संदर्भात उपाययोजना केल्या आहेत.

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात दोन्ही राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचा आढावा

author img

By

Published : Apr 23, 2020, 1:04 PM IST

Updated : Apr 23, 2020, 3:44 PM IST

नंदुरबार - जिल्हा हा महाराष्ट्र-गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात असल्याने सीमावर्ती भागावर करण्यात आलेला बंदोबस्त, किती ठिकाणी सीमा सील केली आहे. लॉकडाऊनमध्ये दळणवळणाची काय परिस्थिती आहे, याची पाहणी करण्यासाठी गुजरात राज्यातील तापी जिल्हा पोलीस अधीक्षक नरेंद्र चौधरी नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा गावानजीक भेट दिली.

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात दोन्ही राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

यावेळी महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत तहसीलदार उल्हास देवरे गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र नजन, महाराष्ट्र आरोग्य टीम, गुजरात उच्छल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निखिल भोया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास गावित आदी उपस्थित होते. गुजरात व महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीमावर्ती भागातील गावांची पाहणी केली.

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलिंग कशा पद्धतीने सुरू आहे यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. दोन्ही राज्यातील पोलीस यांची विशेष आढावा संदर्भात भेट झाली. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ७ पेशंट आहेत. तापी जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त भेट देऊन बॉर्डर सिलिंग संदर्भात उपाययोजना केल्या आहेत. कोणीही गुजरात राज्यात जाणार नाही किंवा गुजरात राज्यातून एकही व्यक्ती महाराष्ट्रात येणार नाही. प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जात आहे. तब्येत खराब असेल तर औषधे देखील दिली जात आहेत. सर्वांनी घरातच राहावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळा अशा पद्धतीने दोन्ही पोलीस दलाच्या आरोग्य, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.

Last Updated : Apr 23, 2020, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.