नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा शहरात कोरोना ९ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर शहादा शहर कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र स्थानिक नगरपालिका, महसूल यंत्रणा, पोलीस प्रशासन यांनी कोरोना साखळी ब्रेक करण्यात यशस्वी ठरली. यामुळे शहादा शहरात रुग्ण वाढले नाहीत. यात आरोग्य कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून शहादा शहरवासियांना कोरोनाच्या विळख्यातून मुक्त करून शहर कोरोनामुक्त केले आहे. त्यामुळे शहरवासियांच्या वतीने या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुस्लीम समाज बांधव आणि सोनार समाज बांधव उपस्थित होते.
शहादा शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे शहरात नवे रुग्ण मिळाल्यानंतर शहादा हॉटस्पॉट शहर होण्याची भिंती निर्माण झाली होती. मात्र आरोग्य कर्मचारी, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी, पोलीस प्रशासन व महसूल कर्मचाऱ्यांनी शहरात वाढता प्रभावावर ताबा मिळविला. शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच नगरपालिका स्वच्छता कर्मचार्यांच्या वतीने शहरात स्वच्छता करण्यात आली. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवून शहरातील वाढता प्रभाव रोखण्यात यश आले. त्यामुळे शहादा शहरवासियातर्फे कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन काढून स्वागत करण्यात आले. तर सुवर्णकार समाजातर्फे महिलांनी योद्ध्यांचे औक्षवंत करून त्याचा सत्कार केला. एकूणच शहरवासीयांनी सत्कार समारंभ आयोजित करून कोरोना योद्धांचे ऋण व्यक्त केले.
हेही वाचा - नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांसह आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह
हेही वाचा - कौतुकास्पद; शहादा शहर कोरोनामुक्त करणाऱ्या योद्ध्यांवर नागरिकांनी उधळली 'फुले'