ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पावसाने ब्रेक घेतल्याने पूर लागला ओसरू - तळोदा

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वच लहान मोठ्या नद्यांना महापूर आला होता. मात्र, पावसाचा जोर कमी होताच पूर ओसरत आहे. नंदुरबारमधील सर्व लहान-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नंदुरबारमध्ये शाळा, महाविद्यालयांना सोमवारची सुट्टी जाहीर
author img

By

Published : Aug 5, 2019, 12:17 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी उसंत घेतली. गेल्या २४ तासांमध्ये धडगाव, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नंदुरबार तसेच नवापूर अशा एकूण ६ तालुक्यांमध्ये ३१८ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नंदुरबारमध्ये शाळा, महाविद्यालयांना सोमवारची सुट्टी जाहीर

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वच लहान मोठ्या नद्यांना महापूर आला होता. मात्र, पावसाचा जोर कमी होताच पूर ओसरत आहे. जिल्ह्यातील सर्व लहान-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे काही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दुर्गम भागातील आणि खेड्यापाड्यांचा जोडणारे लहान पूल पुरामुळे वाहून गेले आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र, प्रशासनाकडून पाहिजे तशी मदत मिळत नसल्याचे चित्र आहे.

नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि अंतर्गत रस्ते पूरस्थितीमुळे बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता पूर ओसरल्याने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, गेल्या चार वर्षापासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्हावासीयांना पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Intro:नंदुरबार जिल्ह्यात शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारी कमी झाला आहे गेल्या 24 तासात धडगाव अक्कलकुवा शहादा तळोदा नंदुरबार नवापूर अशा एकूण सहा तालुक्यांमध्ये 318 पेक्षा जास्त मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे

Body:जिल्ह्यात सर्वच लहान मोठ्या नद्यांना महापूर आला होता पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचा प्रवाह कमी होताना दिसून येत आहे तसेच जिल्ह्यातील सर्व लहान-मोठी धरणे ओवरफ्लो झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नद्यांना काही प्रमाणात पूरस्थिती कायम आहे.

झालेल्या पावसामुळे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे दुर्गम भागातील आणि खेड्यापाड्यांचा जोडणारे लहान फरशी फुल पुरामुळे वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे प्रशासनाकडून पाहिजे तशी मदत नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि अंतर्गत रस्ते पूरस्थितीमुळे बंद ठेवण्यात आले होते पूर्व असल्याने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे

Conclusion:एकूणच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु गेल्या चार वर्षापासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्हावासीयांना पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.