ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये लसीकरणासाठी स्कूल बसचा वापर

नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाच्या मदतीने स्कूल बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. खाजगी शाळेच्या या १६ स्कुल बसमधून लसीकरणासाठी नागरिकांना जाता येईल.

author img

By

Published : May 7, 2021, 11:11 AM IST

शाळेच्या बसचा लसीकरणासाठी वापर
शाळेच्या बसचा लसीकरणासाठी वापर

नंदुरबार - तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाच्या मदतीने स्कूल बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. लसीकरणासाठी नागरिकांना खाजगी शाळेच्या १६ स्कुल बसमधून जाता येईल. यासाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी मच्छिद्र कदम यांनी जिल्ह्यातील खाजगी संस्था चालकांशी संवाद साधला. या बसेसचा डिझेलसह अन्य खर्च हा जिल्हा प्रशासन करणार आहे. मात्र, बस सेवेमुळे गावातील नोंदणी झालेल्या ग्रामस्थांना टप्याटप्याने लसीकरण केंद्रावर ने - आण करुन त्याचे लसीकरण सुखकर करता येईल. यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने हे आणखीन एक पाऊल उचलले आहे. या मोहीमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ राजेद्र भारुड, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आणि शिक्षणअधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.

स्कूल बसचा वापर

16 स्कूल बसेस उपलब्ध..

अहिंसा पब्लिक स्कूल ने एक, पी.जी.पब्लिक स्कूल नंदुरबार 2, के.आर.पब्लिक स्कूल नंदुरबार 2, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार 2, नेमसुशिल इंग्लिश स्कूल नंदुरबार 2, चावरा इंग्लिश स्कूल नंदुरबार 2 आणि खापर येथील ईरा इंटरनॅशनल स्कूलने 2 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाचे मानले आभार....

नियोजनपूर्वक वाहनांचा उपयोग करून ग्रामीण भागात अधिकाधिक लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. वाहनांचा उपयोग करून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यांनी दिल्या.

लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयोग...

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात लसीकरणाच्या रजिस्ट्रेशन साठी लागणारी नेटवर्क उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालयात स्कूल बसद्वारे नागरिकांना लसीकरण करण्यासाठी नेले जाईल. यामुळे दुर्गम भागातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होईल. तसेच जिल्ह्यातील लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.