नंदुरबार - धडगाव तालूक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळ परिसरात पंतप्रधान सडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या भागात रस्ते होऊन दळण-वळणाची साधने उपलब्ध होणार होती. कोट्यवधी रुपये खर्चून बाधण्यात येणाऱ्या या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे स्ट्रिग या भागातील आदिवासी तरुणांनी केले आहे.
तोरणमाळ परिसरात रोडवर बाधण्यात येणाऱ्या पूल आणि संरक्षक भिंतीच्या कामात ठेकेदार परिसरात काळीमाती मिश्रित रेती आणि पुलाचे बांधकाम करत असताना खडीऐवजी दगडाचा वापर करून बांधकाम करत असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात त्यांनी पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत. हे काम अतिदुर्गम भागात करण्यात येत असल्याने कोणताही अभियंता या ठिकाणी भेट देत नसल्याचे समोर आले आहे. या भागात करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे काम पाडून नव्याने करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.