नंदुरबार - आपल्या घरातील एखादी महिला गर्भवती असल्यास तिची विशेष काळजी घेतली जाते. आजच्या कोरोनाच्या परिस्थतीत तिला एखाद्या फुलासारखे जपले जाते. तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. मात्र, याला अपवाद ठरल्या आहेत त्या नवापूर उपजिल्हा रुग्णालयात कार्यन्वित असलेल्या परिचारिका गेंदू गावित. आठ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्या कोरोनासोबत दोन हात करत आहेत.
नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यन्वित असलेल्या गेंदू गावित ह्या आठ महिन्यांचा गर्भवती आहेत. मात्र देशावर कोरोनासारखी आपत्ती आली आहे. त्यामुळे, त्यांनी या आपत्तीसोबत दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्या नवापूर शहरातील गल्ली बोळात फिरून शहरात कुणी बाहेरून आले आहे का, याचे सर्वेक्षण करत आहेत. याशिवाय लोकांमध्ये जनजागृती करीत आपले काम पूर्ण करीत आहेत.