ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला..

नागण प्रकल्पाचे सोडण्यात आलेले पाणी लहान बंधारे व सिमेंट नाला बंधारे नादुरुस्त असल्याने थेट गुजरातमध्ये वाहून जाते.

author img

By

Published : May 11, 2019, 4:31 PM IST

Updated : May 11, 2019, 5:04 PM IST

नागन धरण

नंदुरबार - महाराष्ट्र शासनाद्वारे नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नवापूर तालुक्यातील नागन प्रकल्पातून भरडू गावाजवळ असलेल्या सरपनी नदीद्वारे पाणी सोडण्यात आले. परंतु, जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामांमुळे या पाण्याचा फायदा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांपेक्षा गुजरातला होताना दिसून येत आहे.

आमदार सुरुपसिंग नाईक यांची प्रतिक्रिया

नवापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बद्दल उपाययोजना करण्यासाठी आमदार सुरुपसिंग नाईक यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत अनेकवेळा पत्र व्यवहार केला. प्रत्यक्षात भेट घेतली तरीसुद्धा उपाययोजना झाली नाही. नागण प्रकल्पाचे सोडण्यात आलेले पाणी लहान बंधारे व सिमेंट नाला बंधारे नादुरुस्त असल्याने थेट गुजरातमध्ये वाहून जाते. यासंदर्भात आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे जाणूनबूजून भाजप सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आमदार सुरुपसिंग नाईक यांनी केला आहे.

धरणातून पाणी सोडण्याआधी अधिकाऱ्यांनी सरपनी नदीवरील लहान बंधारे आणि सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी सोडायला पाहिजे होते. परंतु, अधिकाऱ्यांनी तसे केले नाही. त्यामुळेच महाराष्ट्राचे पाणी दुष्काळग्रस्त लोकांना न मिळता थेट गुजरात राज्यातील उकाई धरणात जाऊन जमा होत आहे.

Intro:शासनाद्वारे संपूर्ण नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला होता जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे शेतीसाठी आणि जनावरांना पाणी पिण्यासाठी नवापूर तालुक्यात नागन प्रकल्पांतर्गत भरडू गावाजवळ असलेल्या धरणातून सरपंच नदीद्वारे पाणी सोडण्यात आले या पाण्याचा फायदा खाली असलेल्या गावांना व शेतकऱ्यांना शेतीसाठी होईल या उद्देशाने 1 मे महाराष्ट्रदिनी सोडण्यात आले परंतु या पाण्याचा फायदा महाराष्ट्रातील लोकांना कमी होतांना दिसत आहे तर त्याचा जास्त फायदा गुजरात राज्याला होत आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे पाणी गुजरात मध्ये पळवून नेण्याचा डाव सरकारने आखलेला दिसत आहे.Body:"जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळेच महाराष्ट्राचे पाणी गुजरातला"

धरणातून पाणी सोडण्यात आधी अधिकाऱ्यांनी सरपनी नदीवरील लहान बंधारे आणि सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी सोडायला पाहिजे होते परंतु अधिकाऱ्यांनी तसे केले नाही त्यामुळेच महाराष्ट्राचे पाणी दुष्काळग्रस्त लोकांना न मिळता थेट गुजरात राज्यातील उकाई धरणात जाऊन जमा होत आहे.Conclusion:नवापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बद्दल उपाययोजना करण्यासाठी आमदार सुरुपसिंग नाईक यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना अनेक वेळा पत्र व्यवहार केला प्रत्यक्षात भेट घेतली तरी उपाययोजना झाली नाही.नागण प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले खरे लहान बंधारे व सिमेंट नाला बंधारे नादुरुस्त असल्याने ते पाणी थेट गुजरात राज्यात वाहून जाते यासंदर्भात आदिवासी तालुक्यातील शेतक-यांकडे जाणूनबूजून भाजपा सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार सुरूपसिंग नाईक यांनी केला आहे.

बाईट :- सुरुपसिंग नाईक आमदार नवापूर मतदारसंघ

कृपया बाईट लावावा त्याच्यात मेन मुद्दा उपस्थित केला आहे - तो स्क्रिफ्ट मध्ये घेलेलेला नाही
Last Updated : May 11, 2019, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.