ETV Bharat / state

नंदुरबार: थकीत वीजबिल न भरल्यास महावितरणकडून कारवाईचा इशारा

author img

By

Published : Feb 23, 2021, 5:00 PM IST

गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून ग्राहकांना अखंडीतपणे वीजपुरवठा करण्यात आला. एप्रिल 220 ते जानेवारी 2021 या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 4 हजार 444 ग्राहकांनी वीजबिल थकवले आहे. वीजबिल न भरल्यास वीज कनेक्श कापण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

Appeal to pay electricity bill Nandurbar
वीजबिल न भरल्यास महावितरणकडून कारवाईचा इशारा

नंदुरबार - गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून ग्राहकांना अखंडीतपणे वीजपुरवठा करण्यात आला. एप्रिल 220 ते जानेवारी 2021 या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 4 हजार 444 ग्राहकांनी वीजबिल थकवले आहे. 779.63 कोटींचे वीजबिल थकले आहे. वीजबिल न भरल्यास वीज कनेक्श कापण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

घरगुती वीज ग्राहकांकडे 25 कोटींची थकबाकी

जिल्ह्यात एकूण 47,559 घरगुती विद्युत ग्राहकांनी वीजबिल थकवले आहे. त्यांच्याकडे 25 कोटी 45 लाखांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून संबंधित ग्राहकांनी विद्युत बिल भरले नसल्यामुळे याचा बोजा वीज वितरण कंपनीवर पडला आहे. यात व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांकडे लाखो रुपयांचे वीजबिल थकले असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

थकीत वीजबिल न भरल्यास महावितरणकडून कारवाईचा इशारा

56,885 कृषी पंप ग्राहकांकडे 754.18 कोटींची थकबाकी

जिल्ह्यात एकूण 56, 885 कृषी पंप धारकांकडे 754.16 कोटी इतकी थकबाकी आहे. त्यांना वीज वितरण कंपनीकडून 174.73 कोटींची सूट देण्यात आली आहे. तसेच विलंब आकार व व्याज दरातून देखील सूट देण्यात आल्याने कृषी पंपधारकांना एकूण 260.82 कोटींची सूट देण्यात आली आहे. उर्वरीत रक्कम भरण्याचे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

कृषी पंपधारकांसाठी 2020 नुसार सुधारित धोरण

कृषी पंपधारकांसाठी महावितरणने सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. थकबाकी 2022 पर्यंत भरल्यास 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. मार्च 2023 मध्ये वीजबिल भरण्यास 30 टक्के सूट मिळेल, तर मार्च 2024 मध्ये वीजबिल भरल्यास 20 टक्के सूट मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी या नव्या वीजधोरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.