ETV Bharat / state

अखेर महाराष्ट्रातील बिबट्या गुजरातच्या पिंजर्‍यात जेरबंद - गीर अभयारण्य बिबट्या

महाराष्ट्र -गुजरात बॉर्डरवर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात गुजरात वनविभागाला यश आले आहे. त्यानंतर या बिबट्याला गीर अभयारण्यात सोडण्यात आले आहे.

अखेर महाराष्ट्रातील बिबट्या गुजरातच्या पिंजर्‍यात जेरबंद

author img

By

Published : Dec 10, 2020, 10:35 AM IST

Updated : Dec 10, 2020, 10:42 AM IST

नंदुरबार - तळोदा तालुक्यासह गुजरात हद्दीत धुमाकुळ घालणार्‍या बिबट्याला गुजरातच्या वनविभागाने निंभोरा शिवारात जेरबंद केले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून भयभीत असलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. जेरबंद करण्यात आलेल्या या बिबट्याला गीरच्या जगलात सोडण्यात आले माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून तळोदा तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यात अनेकदा शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना बिबट्याची अचानक दर्शन व्हायचे तर अनेक पाळीव प्राण्यांचा या बिबट्याने फस्त केले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

महाराष्ट्रातील बिबट्या गुजरातच्या पिंजर्‍यात जेरबंद

पिंजऱ्यातील शिकार-

तळोदा शहराला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या हद्दीतील निंभोरा परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सुरू होता. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांसह मजुर वर्ग बिबट्याच्या दहशतीखाली होता. परिणामी शेतीकामावर याचा परिणाम झाला होता. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची निंभोरा गावातील शेतकर्‍यांनी व्यारा येथील वनविभागाकडे मागणी केली होती. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार गुजरात वनविभागाने निंभोरा येथील शेतकरी विष्णू घुले यांच्या शेतालगत पाच दिवसापूर्वी पिंजरा लावला होता. या पिंजर्‍यात बकरा ठेवण्यात आला होता. बकर्‍याला खाण्यासाठी बिबट्याने पिंजर्‍याच्या आत प्रवेश करताच बिबट्या जेरबंद झाला.

शेतकऱ्याच्या निदर्शनास आला जेरबंद बिबट्या

शेतकरी संजय श्रीपत घुले उसाला पाणी देण्यासाठी शेतात जात असताना त्यांना बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच शेतमालक विष्णू घुले यांनी तत्काळ याची माहिती वनविभागास कळवली. त्यानंतर वनविभागाचे पथक निंभोरा येथे दाखल झाले. त्यांनी जेरबंद बिबट्याची तपासणी करून पंचनामा केला. त्यानंतर या बिबट्याला गीरच्या जंगलात नेत सोडण्यात आले. पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांची पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. दिवसा मुक्तसंचार करणार्‍या बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

Last Updated : Dec 10, 2020, 10:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.