ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये भारतीय ट्रायबल पक्षाकडून कृष्णा गावितांना उमेदवारी - भारतीय ट्रायबल पक्ष

भारतीय ट्रायबल पक्षाकडून कृष्णा गावित यांना नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

कृष्णा गावित
author img

By

Published : Apr 27, 2019, 9:17 PM IST

नंदुरबार - भारतीय ट्रायबल पक्षाकडून कृष्णा गावित यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. हा पक्ष पहिल्यादांच निवडणूक लढवत आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत, असे गावित यांनी म्हटले आहे.

कृष्णा गावित

भारतीय ट्रायबल पक्षाची स्थापना गुजरात मधील आदिवासी समाजाचे नेता छोटू भैया वसावा यांनी केली आहे. महाराष्ट्रात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रथमच ते निवडणूक लढवत आहेत. यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गावित यांना उमेदवारी दिली आहे.

गेल्या एकाहत्तर वर्षात आदिवासी समाजाचा विकास झालेला नाही. सातपुड्यात आजही माणूस आजारी पडला तर त्याला झोळी करून ४०-४५ किलोमीटरपर्यंत उपचारासाठी पायी घेऊन जावे लागते. कुपोषण, बेरोजगारी, उच्चशिक्षण, आदिवासी वस्तीगृहातील डीबीटीचा प्रश्न, वन जमीन हस्तांतरण आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी, अशा अनेक प्रश्नांना संसदेत मांडण्यासाठी निवडणूक लढवत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट संविधानातील पाचव्या अनुसूचीची अंमलबजावणी करावी ही आहे. संविधानातील पाचव्या अनुसूचीत प्रत संसदेत धूळ खात पडली आहे. ती शोधण्यासाठी मी थेट दिल्लीला संसद भवनात जात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:या बातमीत उमेदवार कृष्णा गावित यांचा वन-टू-वन एडिट करून पाठवला आहे

भारतीय ट्रायबल पार्टीची स्थापना गुजरात मधील आदिवासी समाजाचे नेता छोटू भैया वसावा यांनी केली आहे महाराष्ट्रात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रथमच त्यांनी भारतीय ट्रायबल पार्टीकडून उमेदवारी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गावित यांना दिली आहे

Body:गेल्या एकतर वर्षात आदिवासी समाजाचा विकास झालेला नाही सातपुड्यात आजही माणूस आजारी पडला तर त्याला झोळी करून 40 45 किलोमीटर पर्यंत उपचारासाठी पायी घेऊन जावं लागतं कुपोषण, बेरोजगारी, उच्चशिक्षण, आदिवासी वस्तीगृहातील डीबीटी चा प्रश्न वन जमीन हस्तांतरण, पेसा कायद्याची अंमलबजावणी अशा अनेक प्रश्नांना संसदेत मांडण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे कृष्ण गावित यांनी सांगितले,

भारतीय ट्रायबल पार्टीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संविधानातील पाचव्या अनुसूची अंमलबजावणी करावी ही आहे संविधानातील पाचव्या अनुसूची ची प्रत संसदेत धूळ खात पडली आहे ती शोधण्यासाठी मी थेट दिल्लीला संसदेत भवनात जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल

Conclusion:आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय ट्रायबल पार्टी लोकसभेच्या रिंगणात आहे उमेदवार कृष्णा गावित यांचे निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा हे आहे

नवीन पक्षाच्या उमेदवारांना मतदार राजा किती खुश करतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.