ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये कोरोना रुग्णात वाढ; केंद्राकडून कोविड कोच दाखल

गेल्या वर्षी देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला होता. वाढता प्रादुर्भाव घेता केंद्रीय आरोग्य मंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वे कोविड कोच वर्षभरापूर्वी तयार केल्या होत्या. या रेल्वे कोविड कोच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत व तेथे वैद्यकीय सुविधा पुरविणे गरजेचे आहे, अशा ठिकाणी पाठविण्यात येत आहे.

author img

By

Published : Apr 12, 2021, 10:53 PM IST

नंदुरबार
नंदुरबार

नंदुरबार - केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागाच्या वतीने जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी रेल्वे कोविड कोच पाठविण्यात येत आहे. त्यानुसार खासदार हिना गावित यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे रेल्वे कोच उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती, या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने अखेर कोविड कोच मध्ये रुग्णांवर उपचार होणार असल्याची माहिती गावित यांनी दिली आहे.

कोविड कोच रेल्वे स्थानकावर दाखल
नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे कोविड कोच दाखल झाले असून रुग्णांवर या कोवीड कोचमध्ये उपचार केले जाणार असल्याची माहिती हिना गावित यांनी दिली आहे. गेल्या वर्षी देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला होता. वाढता प्रादुर्भाव घेता केंद्रीय आरोग्य मंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वे कोविड कोच वर्षभरापूर्वी तयार केल्या होत्या. या रेल्वे कोविड कोच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत व तेथे वैद्यकीय सुविधा पुरविणे गरजेचे आहे, अशा ठिकाणी पाठविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. नंदुरबार येथील रेल्वे स्थानकाच्या प्लार्टफार्म क्रमांक तीन याठिकाणी रेल्वेची कोविड कोच दाखल झाली आहे.

खासदार हिना गावित
300 पेक्षा अधिक रुग्ण घेतील उपचार
या कोविड रेल्वेमध्ये 20 डबे असून एका कोचमध्ये 20 ते 30 बेड असतील. मच्छरदानीसह बाथरूम व दोन बायोटॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एका कोचमध्ये दोन ऑक्सिजन व कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोचमध्ये 300 ते 400 रुग्ण कमी लक्षणे सदृश्य असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहितीही खासदार गावित यांनी दिली आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्र्यानी घेतला मुंबईमधील कोरोना परिस्थितीचा आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.