नंदुरबार - शहरातील सलीम खाटिक यांचा महिलांच्या डोक्याचे केस विकत घेण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या गोडाऊनमध्ये दीड क्विंटल केस साठविले होते. तेच केस चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्याची किंमत सहा लाख रुपये आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले.
हेही वाचा... सोन्याच्या तस्करीत वाढ; 'हे' आहे कारण
नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात राहणारे सलीम खाटिक यांचा महिलांच्या केस विकत घेण्याचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात फिरून गोळा करून आणलेले केस कोलकत्ता आणि चेन्नई येथील कारखान्यात विक बनवण्यासाठी पाठवले जातात. केस कारखान्यात पाठवण्यासाठी, ते गोण्यामध्ये भरून ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी रात्री गोडाऊन फोडून केस भरलेल्या गोण्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.
हेही वाचा... 'रॉ'चा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक
सलिम यांच्या घराच्या तळ मजल्यावर गोदाम असून गोदामाचा कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गोदामातील तीन गोणपाटात भरलेले 150 किलो वजनाचे केस, तसेच 250 किलो वजनांची स्टिलचे ताटे, असा एकुण 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.
हेही वाचा... साहित्य संमेलन : कवी कट्ट्यात मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा अन भ्रष्ट व्यवस्थेचे दर्शन
सलिम खाटीक गोदाम उघडण्यासाठी गेले असता गोदामाचे कुलूप त्यांना तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता, केसांचे तीन गोणपाट व स्टिलची ताटे चोरीला गेली होती. केस चोरी झाल्याची ही पहिलीच घटना आहे. सलिम खाटीक यांच्या फिर्यादीवरुन अज्ञातांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.