नंदुरबार - येथील तळोदा शहरातील मोठा माळी वाडा येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळच्या 10 दिवसाच्या गणरायाची मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. या मंडळाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जिल्ह्यातील पहिली गुलाल विरहित विसर्जन मिरवणुक व मिरवणुकीत विविध प्रकारच्या चित्तथरारक पथक आहेत.
हेही वाचा-नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचे जेलभरो आंदोलन
या मिरवणुकीत पारंपारिक नऊपाऊली नृत्य, गोफ नृत्य, मल्लखांब, एरियल सिल्क मल्लखांब, रोप मल्लखांब, महिला लेझिम नृत्य, महिला ढोल, झांज नृत्य, पुणेरी ढोल, दंड प्रहार युद्ध, मानवी मनोरे, मल्लखांब वरील मनोरे, झेंडा नृत्य, तिरंगा सिल्क, इत्यादी पथकांमध्ये पुरुषा इतकाच महिलांचाही समावेश होता. मंडळाची मिरवणुक अतिशय शिस्तबद्ध होती. त्यामुळे पोलीस दलाने सुद्धा सुटकेचा श्वास घेतला होता.