नंदुरबार - गणेशोत्सव पर्यावरण पूरक व्हावा म्हणून पालकांसाठी आणि मुलांसाठी गणेशमूर्ती बनविण्यासाठी येथे कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा शहरातील कन्यादान मंगलकार्यालयामध्ये घेण्यात आली. मूर्तिकार भारती पवार आणि पूनम भावसार यांनी ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
शाळूमातीपासून तसेच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशी बनवावी याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत मुलांना मोफत देण्यात आले. तसेच गणेश मूर्ती बनविताना त्यात रोपाची बीज टाकण्यात आली आहेत. विसर्जनानंतर त्यातून रोप तयार होईल व यातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होईल, या संकल्पनेतुन मूर्तिकार भारती पवार आणि पूनम भावसार यांनी ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. तर गणेशोत्सव काळात पर्यावरणाबद्दल जनजागृतीसाठी जिल्हाभरात अशा कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.