ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये दोन दुचाकींचा भीषण अपघात; पाच जण ठार - मया लेकाचा मृत्यू

दुचाकींचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती भयानक होती. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले, तर गंभीर जखमी असलेले उमेश व त्यांच्या आईला डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नंदुरबारमध्ये दोन दुचाकींचा भीषण अपघात
नंदुरबारमध्ये दोन दुचाकींचा भीषण अपघात
author img

By

Published : Jul 8, 2021, 11:08 AM IST

Updated : Jul 8, 2021, 11:46 AM IST

नंदुरबार - तळोदा तालुक्यातील तळवे मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तब्बल 5 जणांचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातामध्ये तुळाजा येथील 3 आणि तळोदा येथील 2 मृतांचा समावेश असून त्यामध्ये एका गाडीवरील माय-लेकाचा तर दुसऱ्या गाडीवरील बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.

अपघातामधील मृतांचे फोटो
अपघातामधील मृतांचे फोटो

तीन जण जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद रस्त्यावर सलसाडी फाट्याजवळ सुमारास समोरासमोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली एकमेकांना जोरदार धडकल्या गेल्याने ही घटना घडली. मुलाचे आधार अपडेट करण्यासाठी तुळाजा येथील कुटुंब तळोजा येथे आले होते. ते काम संपवून पुन्हा तुळाजाकडे जात असताना हा अपघात घडला. दरम्यान या अपघातात दारासिंग छगन जाभोरे (48), मदन दिवळ्या नाईक (50), अमित मदन नाईक(10) हे जागीच ठार झाले, तर बोरद येथून शेतीचे कामे पूर्ण करुन दुचाकीने आई आणि पत्नी सोबत तळोदा येथे परतत असणाऱ्या उमेश शांतीलाल चव्हाण व सोबत असलेली त्याची आई सुंनंदा चव्हाण यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पूजा उमेश चव्हाण गंभीर जखमी आहे.

नंदुरबारमध्ये दोन दुचाकींचा भीषण अपघात; पाच जण ठार
अपघातस्थळी ग्रामस्थांची धावदुचाकींचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती भयानक होती. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले, तर गंभीर जखमी असलेले उमेश व त्यांच्या आईला डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू करूनही उमेश यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले नाही. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर सुनंदा शांतीलाल चव्हाण यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

Last Updated : Jul 8, 2021, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.