नंदुरबार- विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावर मोठे कडवान जवळ सकाळी मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात झाला. यामध्ये 18 मजूर जखमी झाले तर 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी यांनी दिली. सर्व मजुरांना खासगी वाहनातून व 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून प्राथमिक उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नवापूर तालुक्यातील बिलबारा, रायंगण, चिखली, आमपाडा, जामतलाव, लहान चिंचपाडा आणि गुजरात राज्यातील खाबदा गावातील 18 मजूर घेऊन पिकअप वाहन नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथील रेल्वे स्थानकावर कामासाठी जात होते. मोठे कडवान येथील फाट्यावर पिकअप वाहनापुढे असलेल्या दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक मारून वळण घेतले. त्याला वाचवण्याचा नादात पिकअप वाहन रस्त्याच्या बाजू कठड्यावर जोरदार आदळल्याने अपघात घडला. यात 18 मजूर जखमी झाले आहे.
हेही वाचा-'कॉल करा अन् मोफत चाचणी करून घ्या', पंजाब सरकारचा अभिनव उपक्रम
अपघातात अनेक मजुरांचे हात पाय फ्रॅक्चर झाले आहे तर अनेकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. महिला मजुरांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील व्यारा येथे खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस कर्मचारी अतुल पानपाटील, अनिल राठोड, यांनी घटनास्थळावर पंचनामा केला. पोलीस ग्रामीण रुग्णालयात देखील उपस्थित होते.
अपघातातील जखमींची नावे
संदीप बाला वसावे वय ३०,रा. बिलबारा | अशोक काशिनाथ वळवी वय ३१,रा. बिलबारा |
चामा-या गोमा वळवी वय २२,रा. बिलबारा | मनोहर निमजी गावित वय २८,रा. बिलबारा |
किशोर भिमसिंग वसावे वय २८,रा. बिलबारा | पिनेश रमेश वसावे वय २२,रा.बिलबारा |
अनिल इमान गावित वय २५,रा.बिलबारा | विशाल नारामजी गावित वय १८, रा.बिलबारा |
हरिष नथ्थू वळवी वय 22, रा.चिखली | राजू मधुकर गावित वय ४५, रा. लहान चिंचपाडा |
पानुबाई फत्तु वसावे वय ५०,रा. खाबदा | विजूबेन हिरालाल वळवी वय, ५४ ,खाबदा |
चंद्रवती संजु वसावे वय २८, खाबदा | अंजूबेन योहानभाई वसावा वय ३०, रा. खाबदा |
सोमुवेल नुजी गावित वय २५, आमपाडा | राजकुमार कर्मा गावित वय ३८, रा. रायगंण |
जितेंद्र चुनीलाल गावित वय ३८, रा. जामतलाव | अनिल गोमा गावित वय २९, रा.जामतलाव |