नंदुरबार : नवापूर तालुक्यातील (Nawapur taluka) चरणमाळ घाटात कांद्याने भरलेला ट्रकचा सकाळी अपघात झाला. यात (Driver dies after truck crashes in Charanmal Ghat) चालकाचा मृत्यू झाला, तर सहचालक गंभीर जखमी (Codriver seriously injured) झाला आहे. त्याला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात याच जागी एका खाजगी लक्झरीला अपघात झाला होता, तर एका ट्रकचा देखील अपघात होऊन त्यात चालकाचा मृत्यू झाला होता.Truck Crashes in Charanmal Ghat
गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या चरणमाळ घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. सकाळच्या सुमारास चरणमाळ घाटात ट्रक क्रमांक आर.जे 21 जीसी 4771 मालेगाव कडून राजस्थानकडे कांदे भरून जात असलेला ट्रक तीव्र उतारावर अनियंत्रित झाल्याने घाटात कोसळला आहे. यात ट्रक डिव्हायडरच्या तुटलेला भागाला ठोकला गेला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूतील गावकरी मदतीला धावून आले. चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने चालक व सहचालकला बाहेर काढले. परंतू यात चालकाचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी चरणमाळ घाटात अपघात दरम्यान लूट थांबवण्यासाठी ग्रामरक्षण समिती स्थापन केल्यानंतर, या ठिकाणी कुठल्याही ट्रकची लूट होत नसल्याचे दिसून आले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप पर्यंत घाटात अपघात होऊ नये, याबाबत ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही. चरणमाळ घाट दुरूस्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. चरणमाळ घाटात भविष्यात मोठा अपघात होऊ नये, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
गेल्या महिन्यात चरणमाळ घाटात एकापाठोपाठ एक तीन ते चार अपघात झाले होते. अपघाताची मालिका सुरू असतानाच नवापूर मतदार संघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी चरणमाळ घाटाची पाहणी करून अपघात ग्रस्त वळणांवर उपाययोजना व्हावी. यासाठी आमदार सुरेशकुमार नाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले होते व अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे देखील निर्देशित करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घाटात गतिरोधक बसवले. परंतु त्याचा काहीसा उपयोग होताना दिसून येत नाही. दुरुस्तीच्या प्रस्तावाला देखील गती मिळत नसल्याने निष्पाप लोकांचा बळी जात आहे. चरणमाळ घाटातील अपघात सत्र कधी थांबेल, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.Truck Crashes in Charanmal Ghat