ETV Bharat / state

नंदुरबार: साक्री वनहद्दीवर मृतावस्थेत आढळला बिबट्या

नंदुरबार-साक्री वनक्षेत्र हद्दीतील सिंदबन गाव शिवारातील संजु हिरा ठेलारी यांच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती नंदुरबार वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार वनविभागाचे व साक्री वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.

author img

By

Published : Dec 1, 2020, 10:03 PM IST

बिबट्या
बिबट्या

नंदुरबार - नंदुरबार-साक्री वनक्षेत्राच्या हद्दीवर बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. दरम्यान बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजु शकले नाही.

नंदुरबार-साक्री वनक्षेत्र हद्दीतील सिंदबन गाव शिवारातील संजु हिरा ठेलारी यांच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती नंदुरबार वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार वनविभागाचे व साक्री वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली तपासणी-

पशुवैद्यकीय अधिकारी अहिरे यांच्या तपासणीत बिबट्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे जखमा मिळून आल्या नाहीत. त्यामुळे प्रथमदर्शनी बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजु शकले नाही. बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करुन पशुवैद्यकीय अधिकारी एस.आर.कोळेकर यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबट्याचे अवयव तपासणीसाठी नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. नाशिक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. बिबट्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी नंदुरबार वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, वनपाल युवराज भाबड, वनरक्षक अरविंद निकम, भानुदास वाघ, ममता पाटील, ठाणेपाडा पोलीसपाटील दिनेश बागुल, वनरक्षक शितल बोरवणे, संजय पाटील व आबा बागुल यांच्या उपस्थितीत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत बिबट्याचे वय 7 ते 8 वर्ष-

नंदुरबार-साक्री वनक्षेत्राच्या हद्दीवर मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचे वय 7 ते 8 वर्ष होते. हा बिबट्या नर जातीचा होता. बिबट्याची लांबी 1.20 मीटर तर उंची 0.75 मीटर होती. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.