नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात रेल्वे आयसोलेशन कोच उपलब्ध करुन दिले होते. या आयसोलेशन कोचमध्ये 21 डबे आहेत त्यात 350 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेऊ शकतात अशी सुविधा करण्यात आली होती. मात्र, एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात रुग्ण नसल्यामुळे आयसोलेशन कोचमधील रुग्णांची एकलव्य कोबी सेंटर व जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे व कोच तूर्तास बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढल्यास कोचमध्ये त्वरित सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोविड आयशोलेशन कोच तुर्तास बंद
नंदुरबार येथे रेल्वे विभागाने मुंबई विभागामधून अद्यावत कोविड आयशोलेशन कोच दाखल केले होते. जिल्ह्यात कोरोना रूग्ण कमी झाल्यामुळे हे कोच तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यात उपचार घेणार्या २७ जणांना नंदुरबार शहरातील एकलव्य कोविड कक्षात पाठवण्यात आले आहे.
रूग्ण संख्येत घट
नंदुरबार जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण वाढले होते. त्यात कोविड रूग्णांना रेमडेसिवीर व ऑक्सिजन बेडसाठी भटकावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळाले होते. सध्या जिल्ह्यातील रूग्णालय व खाजगी दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेड उपलब्ध आहे. तीन आठवड्यापुर्वी जिल्ह्यात कोरोना वाढीमुळे रूग्णांना बेड उपलब्ध व्हावे व ऑक्सिजन मिळावे, यासाठी रेल्वे विभागाच्या मुंबई विभागात नंदुरबार येथे अद्यावत असे रेल्वे कोविड आयसोलेशन कोच तयार केले होते.
२३ दिवसात आयसोलेशन कोचमध्ये ११९ रूग्णांवर उपचार
या कोचमध्ये आतापर्यंत याठिकाणाहून ८७ जण कोरोनामुक्त होवून बाहेर पडले आहे. रेल्वे कोचमध्ये २३ दिवसात ११९ जणांवर उपचार करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यासाठी हे सकारात्मक चित्र आहे.