नंदुरबार - देशभरात कोरोना लसीची ड्रायरनला 2 जानेवारी पासून सुरवात होणार. यात महाराष्ट्रामधील चार जिल्ह्याचा समावेश आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात तीन ठिकाणी व्यवस्था-
नंदुरबार जिल्ह्यातील तीन ठिकाणी ही ड्राय रन होणार आहे. त्यात नंदुरबार जिल्हा रुग्णालय, नंदुरबार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे, उपजिल्हा रुग्णालय नवापूर या ठिकाणी होणार आहे. यासाठी असलेल्या सर्व उपाययोजना झाल्या आहेत. या ठिकाणी लसीकरणाचे प्रत्याक्षिक होणार आहे. मात्र त्यात लसीकरण होणार नाही, असे सांगितले गेलं आहे.
प्रशासन सज्ज-
सकाळी ड्रायरन होईल केंद्र सरकारने नंदुरबार सह राज्यातील इतर तीन जिल्ह्याचा समावेश आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.
हेही वाचा- कोरोना लसीच्या आयात-निर्यातीला केंद्र सरकारकडून परवानगी