ETV Bharat / state

अक्कलकुवा परिसरात घाणीचे साम्राज्य; स्वच्छता न झाल्यास आंदोलनाचा इशारा - अक्कलकुवा नंदुरबार

अक्कलकुवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे. परिसरातील नागरिक डेंग्यू, मलेरिया सारख्या आजाराने त्रस्त झालेले आहेत. गटाराचे पाणी संपूर्ण गावात पसरले आहे. तसेच शाळेच्या मैदानावर देखील घाणीचे पाणी जमा झाले आहे.

cleanliness issue akkalkuwa
अक्कलकुवा परिसरात घाणीचे साम्राज्य
author img

By

Published : Jan 2, 2020, 9:05 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे गेल्या अनेक दिवसांपासून गटारे भरून वाहत आहेत. गटाराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन परिसरातील स्वच्छता कारावी, अन्यथा आंदोलन करण्याची इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

अक्कलकुवा परिसरात घाणीचे साम्राज्य

अक्कलकुवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे. परिसरातील नागरिक डेंग्यू, मलेरिया सारख्या आजाराने त्रस्त झालेले आहेत. गटाराचे पाणी संपूर्ण गावात पसरले आहे. तसेच शाळेच्या मैदानावर देखील घाणीचे पाणी जमा झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. कोणतीही घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रार दिली. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. 2018 पासून आतापर्यंत 14 वित आयोग व 5% पैसा निधी आला. मात्र, तो पैसा गेला कुठे? शहरात कुठेही नवीन रस्ते, गटारी किंवा दुरुस्ती झालेली नाही. कोणतीही विद्युत सुविधा झालेली नाही तर पैसा गेला कुठे? असा सवाल नागरिक विचारत आहेत. याबाबत कोणतीही चौकशी वरिष्ठ विभागाकडून करण्यात येत नाही. ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त काही दलाल सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये बसलेले दिसत आहे. या सर्व प्रश्नांची चौकशी व्हायला पाहिजे व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहेत.

अक्कलकुवा शहरातील सर्व वॉर्डची हीच परिस्थिती आहे. त्यातही वार्ड क्रमांक 4 ची अत्यंत दैन्य अवस्था झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील परिसर तसेच इंदिरानगर येथील गटारांमधील पाणी रस्त्यावर वाहत आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या पोषण आहार खोलीजवळ घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सफाई कर्मचारी हे फक्त काही ठराविक ठिकाणी साफ सफाई करताना दिसतात. गावातील स्वच्छता न झाल्यास नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Intro:नंदुरबार - अक्कलकुवा शहरात अनेक दिवसापासून अनेक गटारी ओवर फूल झाल्या आहे, गटारीच्या घाण पानी ओवर फ्लो होवून भर रस्त्यावर वाहत आहे, ज्या मुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीच दूषित पाणी, घाण कचरा मुळे डासांंचा प्रमाण वाढला आहे, डेंगू , मलेरिया, ताप, आदि मुळे नागरिक त्रस्त झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन परिसरातील स्वच्छता करावी अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे.Body:अक्कलकुवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे. परिसरातील नागरिक डेंगू मलेरिया सारख्या आजाराने त्रस्त झालेले आहेत. गटारीचे गाणी संपूर्ण गावात असल्यामुळे
शाळेच्या मैदानावर जमा झाले आहे. त्यामुळे विद्यार्थयाचे सुधा आरोग्य सुधा धोक्यात आले आहे. कोणतीही घटना घडल्यास याला जबाबदार कोण, ग्रामपंचायतीत अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रार देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. वर्ष 2018 पासून आता पर्यन्त 14 वित आयोग व 5% पैसा निधि आला. परंतु तो पैसा गेला कुठे, शहरात कुठे ही नविन रस्ते, गटारी किंवा दुरुस्ती झालेली नाही. कोणत्या विद्युत सुविधा झालेली नाही तर पैसा गेला कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडले आहे. याबाबत कोणतीही चौकशी वरिष्ठ विभागा कडून करण्यात येत नाही. ग्रामपंचायत निवडून आलेले लोकप्रतिनिधि व्यतिरिक्त काही दलाल सुधा ग्रामपंचायतीत बसलेले दिसत आहे. या सर्व प्रश्नांची चौकशी व्हायला पाहिजे व दोषींवर कार्यवाही व्हावी अशी नागरिकांची मागणी जोर धरु लागली आहे.
Conclusion:अक्कलकुवा शहरातील सर्व वर्डाची हीच परिस्थिति आहे, त्यात वार्ड क्र.4, मध्ये अत्यंत दैन्या अवस्था झाली आहे, न्यू इंग्लिश स्कूलच्या मागच्या परिसर, इंदिरानगर येथील गटारी, ओवर फ्लो होवून घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या पोषण आहार खोली जवळ घाणीचे साम्रज्य झाले आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सफाई कर्मचारी हे फक्त काही ठराविक ठिकाणी साफ सफाई करतांना दिसतात. शहरातील स्वच्छता न झाल्यास नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.