ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये पाण्यासाठी भटकंती करताना गाय दरीत घसली; बांबूलन्सद्वारे दिले जीवदान - गाय दरीत पडली

सातपुड्यातील पाल्हाबारी या गावातील गाय पाण्यासाठी घाटातून रस्ता काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती जखमी झाली. गावकऱ्यांनी या गाईला वाचवण्यासाठी बांबूलन्स झोळी करून घाटातून वर काढून जीवनदान दिले.

बांबूलन्सद्वारे गायला घेऊन जाताना नागरिक
author img

By

Published : Jun 1, 2019, 11:51 AM IST

नंदुरबार - सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत आहे. सातपुड्याच्या पाल्हाबारी गावातील एक गाय दरीत पाण्याच्या शोध घेताना जखमी झाली. यावेळी नागरिकांनी गाईला वाचवण्यासाठी बांबूलन्सचा उपयोग करून तिला जीवदान दिले.

बांबूलन्सद्वारे गायला घेऊन जाताना नागरिक

पाणीटंचाईमुळे सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील दुष्काळी भागात नागरिकांना आणि जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यातील काही भागात अतिधोकादायक दऱ्यांमध्ये झऱ्याचे पाणी आहे. मात्र, तेथे पोहोचण्यासाठी माणसांना आणि जनावरांना पोहोचणे कठीण आहे. तरीही जनावरे पाण्यासाठी या ठिकाणी जात असतात. त्यामुळे येथे अनेक अपघाताच्या घटना घडत असतात. सातपुड्यातील पाल्हाबारी या गावातील गायही पाण्यासाठी घाटातून रस्ता काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती जखमी झाली. गावकऱ्यांनी या गाईला वाचवण्यासाठी बांबूलन्स झोळी करून घाटातून वर काढून जीवनदान दिले.

सातपुड्यातील काही गावांमध्ये प्रशासनाद्वारे गाढवाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, तो पुरेसा नाही तसेच जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन असमर्थ ठरत आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सरकार श्रीमंतांसाठी घाटातून रस्ता काढून मुंबई-पुणे सारखा हायवे बनवू शकते तर आम्हा गरिबांसाठी पायी चालण्यासाठी का रस्ता तयार करू शकत नाही, असा प्रश्न नागरिकांनी सरकारला विचारला आहे.

बांबूलन्स म्हणजे काय?

बांबूच्या मोठ्या काठीवर चादर किंवा कांबळ बांधून केलेल्या झोळीला बांबूलन्स असे म्हटले जाते.
प्रशासन सातपुड्यात सुविधा देऊन विकास करत असल्याचा दावा करत असले तरी येथे अजूनही अनेक समस्या कायम आहेत. दुर्गम भागातील बऱ्याच गावांमधून अद्यापही रूग्णांना आणण्यासाठी ‘बांबूलन्स’चा वापर होत आहे.

Intro:Anchor :- नंदुरबार सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत आहे. सातपुड्याच्या पाल्हाबारी गावातील एक गाय दरीत पाण्याच्या शोध करताना जखमी झाल्याने नागरिकांनी तिला वाचवण्यासाठी बांबूलन्स द्वारे जीवदान दिले
Body:Vo जून महिन्याची सुरुवात झाली आहे पण भारतीय हवामान खात्याने पावसाचे आगमन उशीराने होईल असे संकेत दिल्याने सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील दुष्काळी भागात नागरिकांना आणि जनावरांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात असलेले पाण्याचे स्रोत आटले आहे, सातपुड्याच्या घाटांमध्ये अतिधोकादायक दरीमध्ये काही ठिकाणी झऱ्याचे पाणी आणि आहे परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माणसांना आणि जनावरांना पोहोचणे कठीण आहे,
पाणी हेच जीवन आहे मग ते शोधण्यासाठी जीव गेला तरी चालेल पण पाणी पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सातपुड्यातील पाल्हाबारी या गावातील लहान गाय पाण्यासाठी घाटातून रस्ता काढत असताना तिचा पाय घसरून जखमी झाली आहे तिला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी बांबूलॉन्स झोळी करून घाटातून वर काढून जीवनदान दिले आहे या गावातील काही तरुणांनी रात्रीच्या वेळी देखील झोळी द्वारे या गाईला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, प्रशासनाद्वारे काही गावांमध्ये गाढवा द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे परंतु तो पुरेसा नाही तसेच जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन असमर्थ ठरत आहे,
Conclusion:सरकार श्रीमंतांसाठी घाटातून रस्ता काढून मुंबई-पुणे सारखा हायवे बनवू शकते तर आम्हा गरिबांसाठी पायी चालण्यासाठी ही रस्ता तयार करू शकत नाही का? असा प्रश्न नागरिकांनी सरकारला विचारला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.