ETV Bharat / state

कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे सानुग्रह अनुदान - पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत

शहादा येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक फुलपगारे यांना कोरोनाची लागण झाली होती. धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना कोरोनामुळे त्यांचा 5 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता.

Helping the families of police officers who died in Corona
कोरोनात मृत्यू झालेल्या पोलीसाच्या कुटूंबियांना मदत
author img

By

Published : Oct 17, 2020, 12:37 PM IST

नंदुरबार- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते देण्यात आला.

शहादा येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक फुलपगारे यांना कोरोनाची लागण झाली होती. धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना कोरोनामुळे त्यांचा 5 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक फुलपगारे यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी राज्य मुंबई पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता.

दीपक फुलपगारे यांच्या कुटुंबीयांना कोरोना निधीतून 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले. या मदतीचा धनादेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फुलपगारे यांचा मुलगा मनोज फुलपगारे, मुलगी अक्षदा फुलपगारे, बहीण सुनीता हरीश्‍चंद्र फुलपगारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.