ETV Bharat / state

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर 12 किलो गांज्यासह वाहन जप्त, एकास अटक - नंदुरबार गांजा तस्करी बातमी

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर एका वाहनातून गांजाची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 12 किलो गांजा आढळला. याप्रकरणी वाहनचालकास अटक करण्यात आली असून वाहन व गांजा जप्त करण्यात आला आहे.

NDBR police station
NDBR police station
author img

By

Published : Aug 8, 2020, 2:03 PM IST

नंदुरबार - नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर एका गाडीतून गांजाची वाहतूक करताना एक जण मिळून आला. त्याच्या वाहनातून 84 हजार रुपये किंमतीचा 12 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनचालक गोपाल संजय नेतलेकर (रा.कंरजवाडा, जळगांव) याला अटक करण्यात आली आहे.

नंदुरबार तालुक्यातील दोंडाईचा रस्त्याने गांजाची वाहनातून वाहतुक केली जात होती. चौपाळे गावाच्या फाट्याजवळ वाहन (क्र एम.एच.19 सी. व्ही. 3707) पोलीसांनी अडविली. या गाडीची तपासणी केली असता त्यात 12 किलो गांजा आढळला. हे वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक कमलाकर दिनकर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करुन वाहन चालकास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद्र पाटील करित आहेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.