ETV Bharat / state

Nandurbar Accident : बोलेरो आणि दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार तर सात जण जखमी

बोलेरो व मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. तर सहा जण जखमी झाले असून जखमींना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अजय सुभाष मोरे ( वय, 25 रा. कळंबू ता. शहादा ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर सागर सोमा सोनवणे ( रा. कळंबू ता. शहादा) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

अपघात
अपघात
author img

By

Published : Jan 26, 2022, 10:26 PM IST

Updated : Jan 26, 2022, 10:37 PM IST

नंदुरबार - शहादा - लोणखेडा बायपासवर बोलेरो व मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. तर सहा जण जखमी झाले असून जखमींना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अजय सुभाष मोरे ( वय, 25 रा. कळंबू ता. शहादा ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर सागर सोमा सोनवणे ( रा. कळंबू ता. शहादा) असे गंभीर जखमीचे नाव आहे. शिवाय इतर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतकार्य केले.

शहादा - लोणखेडा बायपासवरील अपघात झाल्यानंतर जमलेली गर्दी

शहादा-लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या पाटीदार मंगल कार्यालयासमोर बोलेरोतील लोक (क्र. एम. एच. 39, जे.3790) सिंधिदिगर येथील रहिवासी होते. तर कळंबू येथील दोघे म्हसावद येथे लग्नासाठी दुचाकीने ( क्र. एम. एच. 39- पी. 8554 ) जात असताना बोलेरो व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. अपघात घडताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा - Mcoca act : नागपूर पोलिसांची कारवाई; तीन टोळ्यांवर लावला मोक्का

Last Updated : Jan 26, 2022, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.