नांदेड : कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. जी माणसे जागरण करत नाहीत, त्यांच्या दारावरून लक्ष्मी देवी परत जाते. कोजागरीला केलेले लक्ष्मी पूजन ( importance kojagiri pornima )विशेष मानले जाते.( Worship Lakshmi Devi on Kojagiri Poornima ) यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते. लक्ष्मी देवीच्या आशिर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णूसहस्रनाम आदींचे पठण करणे शुभ मानले जाते. दमा किंवा अस्थमा यांसारख्या आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.
कोजगिरीचे महत्व - प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेेच्या आधी नऊ दिवसाची नवरात्र आलेली असते. या नऊ दिवसात शक्ति आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवगेळ्या रुपांची मनोभावे पूजा करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो.
कोजागिरी पौर्णिमेबद्दल धारणा : कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.
खगोलशास्त्रीय महत्व - कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिले जाते.