ETV Bharat / state

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्याला काय मिळाले? - maharashtra state budget 2021

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना भरीव निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. पालकमंत्री म्हणून केलेल्या मागण्यांना अर्थमंत्री श्री. पवार यांनी भरीव तरतूद केल्याचे अर्थसंकल्पात दिसून आले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

state budget for nanded
state budget for nanded
author img

By

Published : Mar 10, 2021, 8:41 AM IST

नांदेड - राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या सन 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील 206 कामांसाटी सुमारे 1408 कोटी 93 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना भरीव निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. पालकमंत्री म्हणून केलेल्या मागण्यांना अर्थमंत्री श्री. पवार यांनी भरीव तरतूद केल्याचे अर्थसंकल्पात दिसून आले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यात विविध कामासाठी झाली तरतूद

नांदेड जिल्ह्यात नाबार्ड अंतर्गत 46 कांमासाठी 134 कोटी 55 लाख, राज्यमार्गाच्या 32 कामांसाठी 356 कोटी 25 लाख, प्रमुख जिल्हा मार्गाच्या 86 कामांना 488 कोटी 63 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन इमारतींच्या 9 कामांसाठी 216 कोटी 38 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवासस्थानांच्या 14 कामांसाठी 41 कोटी 64 लाख, विश्रामगृहांच्या 11 कामांसाठी 47 कोटी 92 लाख, महसूल विभाग इमारती/निवासस्थानाच्या 2 कामांसाठी 11 कोटी 84 लाख, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इमारतीच्या 2 कामांसाठी 35 कोटी 86 लाख आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या इमारतीच्या 4 कामांसाठी 75 कोटी 86 लाख निधी अर्थसंकल्पित झाला आहे.

वर्षाभरात कामांना येईल वेग

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील या विविध कामांना निधीची तरतूद केल्यामुळे पुढील वर्षभरात या कामांना वेग येईल व ती लवकर पूर्ण करण्यात येतील असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा - आयसीसी वनडे क्रमवारी : हरमनप्रीत कौर १७व्या स्थानी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.