नांदेड - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान होत आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा व शांततेत मतदान पार पडावे यादृष्टीने नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवले जाणार आहेत. नांदेडमधील कुंटूर तालुका नायगाव (खै.), येवती तालुका मुखेड, उमरी तालुका उमरी, बिलोली, कोंडलवाडी तालुका बिलोली, वाई बा. तालुका माहूर, कौठा, वाजेगाव, नांदेड शहर (महेबुब नगर, लक्ष्मीनगर) तालुका नांदेड व लोहा, मारतळा, कलबंर बु. तालुका लोहा येथील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी येत आहेत. त्यामुळे हे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.
दुसऱ्या दिवशी आठवडी बाजार भरवावा -
पणन संचालक पुणे यांनी दिलेल्या मान्यतेनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील ज्या गावात मतदान केंद्र आहेत त्या गावातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व ठिकाणाचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी बुधवार, दिनांक 2 डिसेंबर, 2020 रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.
1 डिसेंबरला नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद - नांदेड आठवडी बाजार न्यूज
१ डिसेंबरला राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदास संघातील निवजणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्वतयारी करत आहे. नांदेडमध्ये मतदानाच्या दिवशी येणारे आठवडी बाजार बंद ठेवले जाणार आहेत.