ETV Bharat / state

नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी - नांदेड पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा किती तरी पटीने जादा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळयात पैनगंगेला पाणी सोडावे म्हणून आंदोलन करावे लागले होते. आता इसापूर धरणातून पाणी सोडल्याने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी
नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी
author img

By

Published : Sep 26, 2020, 1:39 PM IST

हिमायतनगर (नांदेड) - तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी शेतात पाणी साचले असून हजारो हेक्टरवरील पिके पूर्ण आडवी झाली आहेत. हातचे पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी
नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी
नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी
नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी

तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा किती तरी पटीने जादा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन काढणीला आले असताना अतिवृष्टी, महापुरामुळे सर्व हातचे गेले आहे. सोयाबीन मोड फुटले आहेत. कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. कामारी, दिघी, पळसपूर, धानोरा, वारंगटाकळी या गावांर्यंत नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. भरीस भर म्हणून इसापूर प्रकल्पातून पैनगंगा पाणी सोडण्यात आल्याने महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, हिमायतनगर-ढाणकी, मराठवाडा व विदर्भ यांना जोडणाऱ्या आणि १८ किलोमीटरने जवळचा असणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर गांजेगाव पुलावरून नऊ फुटांपर्यंत पाणी वाहत असल्याने अतिशय जवळचा ठरणारा रस्ता बंद पडला होता.

नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी
नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी

उन्हाळयात याच पैनगंगेला पाणी सोडावे म्हणून आंदोलन करावे लागले होते. आता इसापूर धरणातून पाणी सोडल्याने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.