नांदेड - सुशिक्षित बेराजगार युवकांना दरमहा ५ हजार रुपये निर्वाह भत्ता मिळवा, तसेच त्यांच्या इतर मागण्या देखील पूर्ण व्हाव्यात, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारवर आपला रोष व्यक्त केला.
आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या:
१) सुशिक्षित बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार रुपये निर्वाह भत्ता देणे.
२) सुशिक्षित बेरोजगार युवकांना एम.आय.डी.सी. मध्ये व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे.
३) सुशिक्षित बेरोजगार युवकांना २५ ते ५० लाखापर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून देणे.
४) केंद्र व राज्य शासनाच्या यक पुरस्कृत योजनेची तत्काल अंमलबजावणी करण्यात यावी व प्रलंबित कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात यावे.
५) सर्व वित्तीय महामंडळाचे २०२०-२१ चे आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे व बेरोजगारी कमी करणे. (जिल्हा उद्योग केंद्र खादीग्राम उद्योग व सर्व महामंडळ)
हेही वाचा- खूशखबर..! १० नोव्हेंबरपासून नांदेड - अमृतसर विमानसेवा पुन्हा सुरू होणार