ETV Bharat / state

Education : भोकर परिसरात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचे धडे; शाळाबाहा मुलांना साक्षर करण्यासाठी तरुणाची धडपड

author img

By

Published : Feb 15, 2023, 8:21 PM IST

शाळाबाह्य मुलांना शिक्षण देण्याचे काम खासगी बँक कंपनीतील कर्मचाऱ्याने हाती घेतले आहे. उत्तम दिगंबर पाईकाराव हे गेल्या तीन वर्षांपासून भोकर परिसरात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत.

Education
शाळाबाहा मुलांना साक्षर करण्यासाठी तरुणाची धडपड

नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यासह परराज्यातून आलेल्या अनाथ, झोपडपट्टी, पालावरील शाळाबाहा मुलांना साक्षर करण्याचा विडा एका खासगी बँक कंपनीतील कर्मचाऱ्याने उचलला आहे. उत्तम दिगंबर पाईकराव हे मागील तीन वर्षांपासून भोकर परिसरात दुचाकीला फळा लावून चिमुकल्यांना एकत्र आणून मोकळ्या आकाशाखाली शिक्षणाची 'सावली' हा उपक्रम राबवतात. यात मुलांना वाचायला, लिहायला शिकवले जाते. या उपक्रमामुळे आतापर्यंत दीडशे ते दोनशे मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. विशेष म्हणजे शिक्षणाची गोडी लागल्याने पालावरील व झोपडपट्टीतील १५ ते १७ मुलांनी भिक्षा मागणे सोडून दिले असून छोटी-मोठी कामे करत आहेत.

विद्यार्थांना शिक्षणाचे धडे : उत्तम पाईकराव हे नांदेड जिल्ह्यातील टाकराळा (ता. हिमायतनगर) या छोट्याशा गावाचे रहिवासी. एमएस्सी कॉम्प्युटर सायन्सपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. भोकरमधील एका खासगी बँकेच्या कंपनीच्या माध्यमातून वसुलीचे काम करतात. उरलेल्या वेळेत मोटारसायकलला फळा लावून भोकरमधील शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थांना शिक्षणाचे धडे देता आहेत. पालावर, भिक्षुकांच्या वस्तीत जाऊन शोध घेतात. अल्पशा पगारातूनच कुटुंबाची उपजीविका भागवत त्यातून खर्च बचत करून या मुलांना वही, पुस्तक पेन व शालेय साहित्य देऊन अशा निरक्षर मुलांना अबक अंकगणिताची ओळख करून देतात. तीन वर्षांपासून चाललेल्या या मोफत शिकवणी वर्गात आजघडीला शंभरच्या जवळपास मुले शिक्षण घेता आहेत.

पालावरील मुले माझी आतुरतेने प्रतीक्षा करतात : भोकरमध्ये ७ ते ८ महिने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान येथील १०० मुले होती. ती आता चांगल्या प्रकारे लिहित, वाचत आहेत. बेरीज, वजाबाकी चांगल्या प्रकारे करत आहेत. भिक्षा मागून खाणारी मुलेही शाळा शिकण्यासाठी आता आग्रही असल्याचे दिसते. मुलांमध्ये चांगले परिवर्तन झाले आहे. मी शिकवायला येईल म्हणून मुले नेहमी माझी प्रतीक्षा करत असतात, मुलांची प्रगती पाहून आनंद होत आहे.

अरबाज होणार डाॅक्टर : अरबाजच्या घरच्यांचा व्यवसाय हा मूर्ती बनवण्याचा आहे. घरात तसेच हातावर पोट असल्याने ते तर 6 महिन्यानी उदरनिर्वाहसाठी वेगवेगळ्या गावात जातात. या गावात पाईकरावसरांनी शाळा सुरू केल्यानंतर अरबाज सुद्धा आता शाळेत जाऊ लागला आहे. मोठे होऊन मी सुद्धा डॉक्टर होणार असे अरबाज ने सांगितले आहे.

हेही वाचा - Amazing look of Dharmendra : धर्मेंद्र साकारणार शेख सलीम चिस्तीची व्यक्तीरेखा, फर्स्ट लूक पाहून चाहते अवाक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.