ETV Bharat / state

कंधार तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा ; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ - unseasonable and heavy rain

वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेल्यामुळे एकच धावपळ उडाली. जिल्ह्यातील अन्य काही भागांतही असाच पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ महसूल विभागाच्या वतीने शेती पिकांचे पंचनामे करावेत आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला योग्य न्याय देऊन मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

unseasonable rain in kandhar taluka nanded
नांदेड जिल्ह्यात गारपीठ
author img

By

Published : Apr 7, 2020, 9:53 AM IST

नांदेड - कंधार तालुक्यातील फुलवळ, मुंडेवाडी, वाखरड, वाखरडवाडी, ब्रह्मवाडी, बारी (बु.), कळका, पेठवडज, मंगनाळी, जंगमवाडी, संगम वाडी, बिजेवाडी, शेकापूर, बाचाटी आदी गावांसह इतरही भागात सोमवारी सायंकाळी तब्बल एक तास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

कंधार तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा

हेही वाचा... लॉकडाऊन : 80 वर्षाच्या आजीची तब्बल 3 दिवस पायपीट, चालल्या 'इतके' अंतर

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीने भयभीत, लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेली जनता आणि हाताला काम नसल्याने बेजार असलेला बेरोजगार नागरिक पुर्णतः वैतागलेले आहेत. असे असतानाच सोमवारी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्याच्या स्थितीला बहुतांश ठिकाणी गहू कापणी आला आहे, हळद आणि हरभरा पिकाचीही काढण चालू आहे. तसेच शिजवलेल्या हळदीचे बरेच नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी उन्हाळी भुईमूग, ज्वारी या उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या कैऱ्यांचा सडा पडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.