नांदेड - बिलोली तालुक्यातील येसगी येथील मांजरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मृत्यू पावलेले दोघेही लगतच्या तेलंगणा राज्यातील निझामाबाद दोह येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही बुडाले होते. प्रकाश बाबूराव वाघमारे व आकाश साहेबराव जोगेवार अशी मृतांची नावे आहेत.
वाळू उत्खननाचे खड्डे-
महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवरून वाहणाऱ्या मांजरा नदी पात्रात बऱ्याच प्रमाणात पाणी आहे. मात्र, या नदी पात्रात नियमबाह्य पद्धतीने जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करण्यात येते. त्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे पाण्याचा अंदाज लागणे कठीण झाले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारच्या वेळी पोहण्यासाठी हे तरुण गेले होते.
निजामाबाद येथील रहिवासी-
तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथील रहिवासी प्रकाश बाबूराव वाघमारे व आकाश साहेबराव जोगेवार हे दोघे पोहण्यासाठी येसगी येथील मांजरा नदी पात्रात गेले. पाण्याचाअंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस स्टेशनचे बीट मादार बोपने यांनी घटनास्थळ गाठून स्थानिक नागरिकांच्या मदतीने ती मृतदेहांचा शोध घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. उत्तरीय बसणीसाठी दोन्ही मृतदेह बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात त्याची माहिती बीट जमादार बोपने यांनी दिली आहे.