नांदेड - हदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचा गैरकारभार समोर आला आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शेंदन बिटच्या जंगलातील प्लांटेशनवर एकही रोपटं नाहीय."झाडे लावा झाडे जगवा" या योजने अंतर्गत राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातोय.पण प्रत्येक्षात ही योजना मात्र कागदावरच असल्याचा प्रकार समोर ( forest lovers demanded an inquiry tree plantation scheme in nanded ) आला आहे.
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी - दरवर्षी या या भागात लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येतो.फक्त दोन फुटाचे खड्डे खोदून त्यात एक ही रोपटं लावण्यात येत नाही.योजना राबविल्याचा फलक मात्र त्या जागेवर लावण्यात येतो.प्रत्येक्षात मात्र शासनाची योजना कागदावरच असल्याचा प्रकार या वनपरिक्षेत्र भागात दिसून येत आहे. हदगाव वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांची देखील मोठी संख्या आहे.पण वन अधिकारीच उंटावरून शेळ्या हाकत असल्याने वृक्ष तोडी बरोबर वन्य प्राण्यांची शिकारी देखील होत आहेत.दरम्यान हदगाव वनपरिक्षेत्र या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शेंदन बिटच्या जंगलात वृक्षलागवड योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी वन प्रेमींनी केली आहे.
जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड - हदगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या शेंदन बीटच्या जंगलात प्लांटेशनची पहिली आणि दुसरी वेंडिंग करण्यात आली असून यात भरणा देखील करण्यात आला नाहीय.या जंगलात २० हेक्टर वर एकूण १२००० हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्टे आहे.पण प्रत्येक्षात या प्लांटेशनवर एक ही रोपटं पहावयास मिळत नाही आहे. हदगाव वनपरिक्षेत्र या कार्यालयातील वनाधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करत असतात.त्यामुळे या जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड देखील होत आहे.नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर तालुक्या नंतर हदगाव तालुक्यात सर्वाधिक वन परिक्षत्र आहे.