नांदेड - कोरोना विषाणू पसरू नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, असे असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. नांदेड जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी अनेक वेळा घराबाहे न पडण्याच्या सूचना दिल्या. आदेशाचे पालन न करणाऱ्या गरज नसताना घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांचे 123 वाहन नांदेड वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जप्त करत कारवाई केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर न पडण्याच्या सूचना अनेकवेळा देऊनही नागरिक नियमांची पायमल्ली करत असल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतर ही अनेक वाहनचालक नियम मोडत आज रस्त्यावर आल्याचे आढळून आल्याने शहर वाहतूक शाखेने तब्बल १२३ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली आहेत.
आदेशानुसार सदरील १२३ वाहने १२ दिवस जप्त राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे.