नांदेड- प्रवाशांच्या सुविधेकरता आणखी तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार आता नांदेड–श्रीगंगानगर- नांदेड दरम्यान दोन विशेष गाड्या तर सिकंदराबाद-जयपूर-सिकंदराबाद या मार्गावर एक गाडी सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
तिन्ही गाड्या संपूर्ण आरक्षित
या तिन्ही विशेष रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या रेल्वेमधून प्रवास करता येणार नाही. तसेच रेल्वेने प्रवास करण्यासाठी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक असणार आहे. अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
असे असेल या तीन विशेष गाड्यांचे वेळापत्रक
१) गाडी क्रमांक ०२४३९ हु. सा. नांदेड ते श्रीगंगानगर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २७ डिसेंबर, २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान दर रविवारी सकाळी ११.०५ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडा, हनुमानगढ मार्गे सोमवारी रात्री ०८.१५ वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल.
२.गाडी क्रमांक ०२४४० श्रीगंगानगर ते हु. सा. नांदेड साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दिनांक २५ डिसेंबर, २०२० ते २९ जानेवारी, २०२१ दरम्यान दर शुक्रवारी दुपारी ०१.२५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि हनुमानगढ, भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे शनिवारी रात्री ०९.४० वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.
३.गाडी क्रमांक ०२४८५ हु. सा. नांदेड ते श्रीगंगानगर विशेष द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक २४ डिसेंबर, २०२० ते ०१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११.०५ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडा मार्गे रात्री ७ वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल.
४. गाडी क्रमांक ०२४८६ श्रीगंगानगर ते हु. सा. नांदेड द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दिनांक २२ डिसेंबर, २०२० ते ३० जानेवारी, २०२१ दरम्यान दर मंगळवार आणि शनिवारी दुपारी ०२.४५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे रात्री ०९.४० वाजता नांदेड येथे पोहोचेल.
५. गाडी क्रमांक ०९७१४ सिकंदराबाद ते जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ डिसेंबर २०२० ते ०१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी सिकंदराबाद येथून रात्री ०९.४० वाजता सुटेल आणि नांदेड, हिंगोली, अकोला, भोपाल, उज्जैन, कोटा मार्गे जयपूर येथे सकाळी ०६.४५ वाजता पोहोचेल.
६.गाडी संख्या ०९७१३ जयपूर ते सिकंदराबाद साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २६ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ दरम्यान दर शनिवारी जयपूर येथून रात्री १०.३५ वाजता सुटेल आणि कोटा, उज्जैन, भोपाल, अकोला, हिंगोली, नांदेड मार्गे सिकंदराबाद येथे रविवारी सकाळी ०६.५० वाजता पोहोचेल.