नांदेड - विनयभंग केल्याप्रकरणी भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी एका आरोपीस तीन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पांडुरंग दत्तराम गोपतवाड (वय 28, रा. रिठ्ठा, ता. भोकर), असे आरोपीचे नाव आहे. पांडुरंग हा 19 आक्टोबर, 2018 रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला होता. यावेळी पीडितेचा भावाने बहिणीला हाक मारत घरात प्रवेश केला. तेव्हा आरोपी पांडुरंग हा स्वयंपाक घरात लपून बसला आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेला दिली.
याप्रकरणी 20 ऑक्टोबर 2019 रोजी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व पुराव्याच्या आधारे न्यायाधीश मुजीब शेख यांनी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा आणि 10 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी पक्षाची बाजू अॅड. रमेश राजूरकर यांनी मांडली तर तपासणी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस. यू. सय्यद यांनी काम पाहिले.
हेही वाचा - तिप्पट नोटांचे आमिष दाखवून ३ लाखांची फसवणूक; तेलंगणातील आरोपींना अटक