ETV Bharat / state

Nanded Crime : व्यापाऱ्याच्या हत्येमुळे किनवटमध्ये तणाव ; आरोपींना अटक न झाल्यास, मृतदेह पोलीस ठाण्यात आणण्याचा इशारा - व्यापाऱ्याच्या हत्येमुळे किनवटमध्ये तणाव

नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये जागेच्या वादावरून झालेल्या मारहाणीत एका व्यापाऱ्याचा मृत्यु झाला ( Tensed situation in kinwat) आहे. १२ डिसेंबर रोजी मारहाणीची घटना घडली (Trader murder over land dispute) होती. याबाबत मारेकऱ्यांना तत्काळ अटक न झाल्यास मृतदेह पोलीस ठाण्यात आणला जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. पोलीस आरोपीच्या शोधात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले (land dispute in Nanded) आहे.

Nanded Crime
व्यापाऱ्याच्या मृत्यूने किनवटमध्ये तणाव
author img

By

Published : Dec 29, 2022, 10:37 AM IST

नांदेड : किनवटमध्ये जागेच्या वादावरून दोन व्यापारी भावंडांना जबर मारहाण केली (kinwat Trader murder) होती. त्यातील एका व्यापाऱ्याचा हैदराबाद येथे सोळाव्या दिवशी २७ डिसेंबर रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून आर्य वैश्य समाजाने बुधवारी बंद पाळला, तर गुरुवारी व्यापारी असोसिएशनच्या वतीने किनवट बंदची हाक दिली आहे. आरोपीच्या शोधात दोन पथके औरंगाबाद- यवतमाळकडे रवाना झाले आहेत. स्थानिक आठ ठिकाणी पोलीस आरोपीच्या शोधात असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांनी (land dispute in Nanded) सांगितले.

जबर मारहाण : १२ डिसेंबर रोजी भोई गल्ली (किनवट) येथील संतोषकोल्हे यांच्या घरासमोर जागेच्या वादावरून विक्की कोल्हे, संतोष कोल्हे, विशाल कोल्हे यांनी मिळून बंडू कंचर्लावार व त्यांचे बंधू श्रीकांत कंचर्लावार आणि मुनीमाला यांना जबर मारहाण केली (Trader murder over land dispute) होती. प्रकृती गंभीर असल्याने या दोघाभावंडाना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले. तर मृतदेह पोलीस ठाण्यात नेणार व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक न झाल्यास मृतदेह पोलीस ठाण्यात आणला जाईल, असा इशारा निवेदनातून दिला ( Tensed situation in kinwat) आहे. निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांना दिले आहे. निवेदनावर किराणा व भुसार असोसिएशचे अध्यक्ष दिनकर चाडावार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपाचे अशोक नेम्मानीवार, शिवराज चाडावार, व्यंकट भंडारवार, अखिल खान, अजय चाडावार, दीपक चाडावार, युसूफ खान, गजानन चाडावार, आशिष चाडावार, अमित चिन्नावार यांच्यासह शंभराहून अधिक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या (Murder in Nanded ) आहेत.

तगडा बंदोबस्त : श्रीकांत कंचर्लावार यांचे २८ रोजी अवयव दान हैदराबाद येथे केले असून त्यांच्या पार्थिवावर २९ डिसेंबर रोजी दुपारी किनवट येथे अंत्यसंस्कार होतील. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक के.ए. धरणे यांनी बुधवारी रात्री किनवटला भेट दिली असून ते तळ ठोकून आहेत. दरम्यान बंदोबस्तसाठी बाहेरुन पथक आले आहे.

मारहाणीत एकाचा मृत्यू : किनवट येथील व्यापारी श्रीकांत कंचर्लावार व त्यांच्या बांधवावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक (murder over land dispute) करावी. पोलीस निरीक्षकाला निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करावी, असे पत्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २८ डिसेंबर रोजी दिले आहे. घटनेस १६ दिवस झाले, तरी आरोपीस अटक केलेली नाही. अशातच मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेविरुद्ध प्रचंड नाराजी असल्याचे पत्रात म्हटले (Nanded Crime) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.