नांदेड - गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर झाला असून राज्यातही गारठा वाढला आहे. नांदेड जिल्ह्यातही चांगलीच थंडी वाढली असून तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. सर्वत्र थंडीमुळे पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे. दरम्यान रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून गहू, हरभरासह पीके फुलू लागली आहेत. हिमालय पर्वत, उत्तर भारत आणि लगतच्या राज्याचा थंडीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्याचा परिणाम राज्यातही याचा परिणाम जाणवत आहे. राज्याच्या वातावरण चढ उतार जाणवत आहे.
वातावरणात बदल
यंदा थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी गायबच होती. वातावरणातील बदलामुळे व सातत्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, आता वातावरण पूर्णपणे कोरडे झाले आहे. यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसात तापमानात मोठी घट झाली आहे.
हेही वाचा - जळगावात पारा 10 अंशांवर; हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद